S M L

सेन्सॉर बोर्डाची दबंगगिरीवर बॉलिवूडचे दिग्गज एकत्र

Samruddha Bhambure | Updated On: Mar 17, 2015 02:34 PM IST

सेन्सॉर बोर्डाची दबंगगिरीवर बॉलिवूडचे दिग्गज एकत्र

17 मार्च : सेन्सॉर बोर्डाच्या कार्यपद्धतीबाबत बॉलिवूडच्या कलाकारांनी माहिती-प्रसारण मंत्री राजवर्धन सिंग राठोड यांची भेट घेतली आहे. तसचं बोर्डाचे अध्यक्ष पहलाज निहलानी यांना पदावरुन दूर करण्यात यावं, अशी मागणीही केली आहे.

केंद्रीय सूचना प्रसारण राज्यमंत्री राज्यवर्धन राठोड यांच्यासोबत काल (सोमवारी) बॉलीवूडच्या काही निर्माता-दिग्दर्शक-कलाकारांनी एकत्र येत मुंबईत बैठक घेतली. या बैठकीला बॉलिवूडमधले अनेक दिग्गज एकत्र आले. यात आमीर खान- किरण राव यांच्यासवेत मुकेश भट्ट, रमेश सिप्पी, गुलजार, विशाल भारद्वाज, अनुराग कश्यप, करण जोहर, राजकुमार हिरानी, विद्या बालन, सिद्धार्थ् रॉय-कपूर, रितेश देशमुख, अनुष्का शर्मा यांचा समावेश होता.

सेन्सॉर बोर्डाच्या माजी अध्यक्ष्या लीला सॅमसन यांनी राजीनामा दिल्यानंतर पहलाज निहलानीयांना अध्यक्षपद दिले. पण सेन्सॉर बोर्डाची सूत्र हाती घेताच चित्रपटाच्या सेन्सॉरशिप तसंच सर्टिफिकेशनबाबत त्यांनी अनेक नवे निर्णय घेतले आहे. तसचं चित्रपटांमध्ये कोणते शब्द वापरू नयेत याची यादीही जाहीर केली आहे. ज्यावर अनेक बॉलिवूडकरांनी नाराजी व्यक्त केली आहे.

दरम्यान, चित्रपटसृष्टीकडून अनेक सूचना आल्या असून त्याकडे लक्ष दिले जाईल आणि कलाकारांचं समाधान केलं जाईल असं आश्वासन राज्यवर्धन राठोड यांनी दिलं आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 17, 2015 09:10 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close