S M L

गुन्हेगारी कुणाच्या काळात वाढली ?; दादा-मुख्यमंत्र्यांमध्ये कलगीतुरा

Sachin Salve | Updated On: Mar 17, 2015 07:06 PM IST

गुन्हेगारी कुणाच्या काळात वाढली ?; दादा-मुख्यमंत्र्यांमध्ये कलगीतुरा

17 मार्च : विधानसभेत चर्चेदरम्यान माजी उपमुख्यमंत्री अजित  पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात कलगीतुरा रंगला. राज्यात गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललंय असा आरोप अजित पवारांनी केला आणि त्याला लागलीच मुख्यमंत्र्यांनी हे आधीच्या सरकारचं पाप असल्याचं सांगत परिस्थितीत सुधारणा होत असल्याचं नमूद केलं. यावेळी या दोघांमध्ये चांगलीच शाब्दिक चढाओढ झाली.

अजित पवार म्हणतात, नवीन सरकार आल्यापासून कायदा सुव्यवस्था राखण्यात सरकारला अपयश आलंय. गेल्या पाच महिन्यात सातत्याने महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात वाढत आहे. अपहरण, महिलांवर अत्याचार, बलात्काराच्या घटना घडत आहे. पोलिसांचा दरारा आता राहिलेला नाही. राज्याचे गृहराज्यमंत्री अहमदनगरचे पालकमंत्री आहे. आणि त्यांच्याच जिल्ह्यात एका तरुणाची नग्न धिंड काढण्यात आली. या घटना घडत असताना राज्य सरकारचं हे अपयश नाही का ? असा सवालच अजित पवार यांनी उपस्थित केला.अजित पवारांच्या प्रश्नाला देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं. नवीन सरकारला काम सुरू करून पाच महिने झाले आहे. सरकार काम करत आहे. पण, मागील सरकारच्या काळात जास्त गुन्हे घडलेत. आमच्या सरकारच्या काळात याचे प्रमाण कमी झाले असून यावर वचक आणण्यासाठी काम करू असं आश्वासनं मुख्यमंत्र्यांनी दिलं.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 17, 2015 07:04 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close