S M L

परदेश दौरा भोवला, 'महानंद'च्या 7 संचालकांची हकालपट्टी

Sachin Salve | Updated On: Mar 17, 2015 09:12 PM IST

 परदेश दौरा भोवला, 'महानंद'च्या 7 संचालकांची हकालपट्टी

17 मार्च : महानंद दूध महासंघाच्या 7 संचालकांची हकालपट्टी करण्यात आलीय. हे सातही सदस्य राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत. परवानगीशिवाय केलेला परदेश दौरा त्यांना भोवलाय. या सात संचालकांना 5 वर्ष महानंदाची निवडणूक लढविता येणार नाही.

सरकारची पूर्व-परवानगी न घेताच या सात सदस्यांनी चीन आणि इस्रायलचा दौरा केला होता. या दौर्‍यामध्ये लाखोंची उधळपट्टी करण्यात आल्याचा आरोप आहे आणि त्यामुळेच 33 पैकी सात संचालकांवर दुग्धविकास मंत्री एकनाथ खडसे यांनी कारवाई केलीये. आणि त्यांचं पद रद्द करण्यात आलंय. ही कारवाई राजकीय हेतूने करण्यात आल्याचा आरोप निलंबित संचालिका वैशाली नागवडे यांनी केलाय.

हकालपट्टी झालेले हे संचालक कोण आहेत ?

- वैशाली नागवडे - अध्यक्ष, महानंद

- राजेंद्र जाधव - उपाध्यक्ष, महानंद

- विनायक पाटील

- दिलीप पाटील

- सुनील फुंडे

- रामराव वडकुते

- नीळकंठराव कोंढे

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 17, 2015 08:57 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close