S M L

अण्णांची पदयात्रा रद्द, पण देशव्यापी दौरा करणार !

Sachin Salve | Updated On: Mar 17, 2015 11:31 PM IST

anna in jantarmant17 मार्च : भूसंपादन विधेयकाच्या विरोधात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पदयात्रेची घोषणा केली होती. मात्र, अवकाळी पावसामुळे नियोजित सेवाग्राम ते दिल्ली पदयात्रा स्थगित केलीय. पण ते देशव्यापी दौरा मात्र करणार आहेत.

आज राळेगणसिद्धीमध्ये देशभरातल्या कार्यकर्त्यांची बैठक झाली. त्यात दौरा रद्द स्थगित करण्याचा निर्णय झाला. आधी दुष्काळ आणि नंतर अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे राज्यातला शेतकरी संकटात आहे.

अशा स्थितीत पदयात्रा काढणं कदाचित योग्य दिसणार नाही. त्यामुळेच अण्णांनी ही पदयात्रा स्थगित केलीय. मार्चच्या अखेरीला वर्ध्याहून ही पदयात्रा सुरू होणार होती. आणि दोन महिन्यांनंतर ही पदयात्रा दिल्लीला पोहोचणार होती.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 17, 2015 09:10 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close