S M L

फडणवीस सरकारचं आज पहिलं बजेट

Samruddha Bhambure | Updated On: Mar 18, 2015 01:43 PM IST

फडणवीस सरकारचं आज पहिलं बजेट

18 मार्च :  राज्यातील भाजप-शिवसेनेच्या युती सरकारचा आज पहिला अर्थसंकल्प सादर होणार आहे. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आज विधिमंडळात राज्याचा अर्थसंकल्प सादर करतील. राज्याची आर्थिक परिस्थिती चिंताजनक असल्याने उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करण्याबरोबरच सर्वसामान्य जनतेला करवाढीचा फटका बसू नये, याची खबरदारी या अर्थसंकल्पात घेण्यात आली आहे.

गारपीट, अवकाळी आणि दुष्काळाने होरपळलेला शेतकरी आणि महागाईच्या झळा सोसणारी सर्वसामान्य जनता, तसंच उद्योगजगतासह अनेक बाबींना अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार कितपत न्याय देतात, याकडे संपूर्ण महाराष्ट्राच्या नजरा लागल्या आहेत. आज दुपारी दोन वाजता अर्थमंत्री मुनगंटीवार अर्थसंकल्प सादर करतील. 40 हजार कोटी रूपयांच्या राज्याच्या अर्थसंकल्पात यंदा वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. विकासकामांसाठी लागणारी आर्थिक तरतूद आणि उत्पन्न यामधील तफावत दूर करणं अर्थमंत्र्यांपुढे मोठे आव्हान असेल. त्यामुळे आधीच्या सरकारनं तिजोरी रिती केल्याचा आरोप करणारे सत्ताधारी यावर काय तोडगा काढतात, हे पाहणेही महत्वाचं आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 18, 2015 10:06 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close