S M L

सेनेचं नाराजीनाट्य, बजेटमध्ये मुंबईसाठी काहीच नाही !

Sachin Salve | Updated On: Mar 18, 2015 09:31 PM IST

सेनेचं नाराजीनाट्य, बजेटमध्ये मुंबईसाठी काहीच नाही !

18 मार्च : राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. पण या अर्थसंकल्पावर शिवसेनेनं नाराजी व्यक्त केलीये. कोकण आणि मुंबईसाठी कोणतीही भरीव तरतूद नाही अशी नाराजीच सेनेचे आमदार सुनील शिंदे आणि उदय सामंत यांनी व्यक्त केलीये. मुख्यमंत्र्यांना भेटून नाराजी व्यक्त करणार अशी प्रतिक्रिया उदय सामंत यांनी दिलीये.

शिवसेना आणि भाजपमध्ये धुसफूस अजूनही सुरूच आहे. राज्याच्या अर्थसंकल्पावर शिवसेनेच्या आमदारांनी नाराजी व्यक्त करून आता यात आणखी भरात भर टाकलीये. आमच्यात असे कोणतेही मतभेद नाही. पण, बजेटमध्ये मुंबईसाठी कोणतीही विशेष घोषणा नाही. मुंबईतील कोस्टल रोड, गिरणी कामगारांचा प्रश्न आहे, बीडीडी चाळीचा प्रश्न, मुंबईकरांच्या मुलभूत गरजा आणि गृहनिर्माण धोरण आणू याबद्दल कुठेही उल्लेख नाही. याबद्दल आम्हाला सुचनाही मांडता आल्या नाहीत. अर्थसंकल्पात मुंबई म्हणून कुठे तरी उल्लेख असायला हवा होता अशी आमची इच्छा होती पण, ही गोष्ट आम्ही नजरेस आणून दिली अशी नाराजी सेनेचे आमदार सुनील शिंदे यांनी व्यक्त केली. तर कोकणासाठी कोणतीही भरीव तरतूद नाही. याबद्दल मुख्यमंत्र्यांना भेटून नाराजी व्यक्त करू असं उदय सामंत यांनी म्हटलंय. परंतु, सेनेच्या आमदार नीलम गोर्‍हे यांनी मात्र वेगळीच प्रतिक्रिया दिली. मुंबईतील क्रुड तेल कंपन्या निधी देतात. पण हा निधी केंद्राला जातो. या कंपन्या मुंबईत असल्यामुळे त्याचा विचार व्हावा अशी अपेक्षा व्यक्त करत त्यांनी बजेटचं स्वागत केलं. हे बजेट जनतेच्या आशा अपेक्षा उचवणारं बजेट आहे असंही गोर्‍हे म्हणाल्यात. सेना आमदारांच्या नाराजीचा भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी समाचार घेतला. सेनेच्या आमदारांनी बजेट नीट वाचलं, तर नाराजी दूर होईल असा खोचक टोलाच आशिष शेलारांनी लगावला.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 18, 2015 09:31 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close