S M L

ट्युनिशियामधल्या दहशतवादी हल्ल्यात 20 परदेशी पर्यटक ठार

Samruddha Bhambure | Updated On: Mar 19, 2015 10:40 AM IST

ट्युनिशियामधल्या दहशतवादी हल्ल्यात 20 परदेशी पर्यटक ठार

19 मार्च :  ट्युनिशियामध्ये संसदेजवळील प्रसिद्ध बार्डो म्युझियमवर ब्दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 22 जणं ठार झाले आहेत. त्यामध्ये 20 परदेशी पर्यटक आणि 2 स्थानिक नागरिकांचा समावेश आहे. त्याशिवाय 2 हल्लेखोरांना ठार करण्यात सुरक्षा सैनिकांना यश आलं आहे.

गृहमंत्रालयाचे प्रवक्ते महंमद अली अरोई यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे हल्लेखोर सैनिकांच्या गणवेशात आले होते. दोनपेक्षा अधिक दहशतवाद्यांनी हा हल्ला केला. पर्यटक बसमधून उतरल्यानंतर त्यांनी त्यांचा पाठलाग केला आणि म्युझियममध्ये त्यांच्यावर गोळीबार केला. विशेष म्हणजे हल्ला झालेल्या म्युझियमपासून ट्युनिशियाची संसद अगदी जवळ आहे. हल्ल्याच्या वेळी म्युझियममध्ये100 पेक्षा जास्त परदेशी पर्यटक होते. हल्ल्यात 20 पर्यटकांचा मृत्यू झाला. तर बहुतांश पर्यटकांची सुखरूप सुटका करण्यात आली. सुरक्षा दलाच्या जवानांनी दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिले. त्यात 2 दहशतवाद्यांचा खात्मा झाला, तर अन्य दहशतवादी पसार झाले.

या घटनेची जगभरातून निंदा होतेय. भारतानेही या दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला आहे. हा हल्ला निषेधार्ह असून आम्ही तेथील स्थानिक जनतेच्या बाजूने उभे आहोत; तसेच तेथील जनजीवन सुरळी व्हावे, हीच आमची प्रार्थना असल्याची भावना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटरवर व्यक्त केली आहे. दरम्यान, दिवसाढवळ्या हा हल्ला झाल्यामुळे ट्युनिशियामध्ये घबराटीचं वातावरण आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 19, 2015 10:40 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close