S M L

विधान परिषद सभापतीपदासाठी शिवसेनेकडून नीलम गोर्‍हेंना उमेदवारी

Samruddha Bhambure | Updated On: Mar 19, 2015 02:21 PM IST

विधान परिषद सभापतीपदासाठी शिवसेनेकडून नीलम गोर्‍हेंना उमेदवारी

19 मार्च : विधान परिषद सभापतीपदाची निवडणूक आता प्रतिष्ठेची लढाई बनली आहे. या निवडणुकीत राज्याच्या चारही प्रमुख पक्षांनी आपले उमेदवार रिंगणात उतरवल्याने शह कटशहाचे राजकारण चांगलेच रंगले आहे

शिवसेनेन विधानपरिषदेच्या सभापतीपदाच्या निवडणुकीत नीलम गोर्‍हेंना रिंगणात उतरवलं आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसने या पदासाठी रामराजे निंबाळकर यांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेसकडूनही शरद रणपिसेंनी उमेदवारी अर्ज दाखल केला असून श्रीकांत देशपांडे अपक्ष म्हणून रिंगणात उतरले आहेत पण त्यांना भाजपचा पाठिंबा असल्याचं समजतये. त्यामुळे सभापतीपदाच्या निवडणुकीत आता भाजप राष्ट्रवादी काँग्रेसला मदत करणार की शिवसेनेला याकडेचं सगळ्याचं लक्ष लागलं आहे.

विधान परिषदेत शिवसेनेची सदस्य संख्या कमी आहे. तरीही मित्रपक्ष भाजपची कोंडी करण्यासाठीच शिवसेनेने सभापतीपदाची निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

संख्याबळाचा विचार केला, तर विधानपरिषदेत राष्ट्रवादीच्या सर्वाधिक जागा आहेत. एकूण 78 सदस्य असलेल्या विधान परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वाधिक 28 सदस्य आहेत. त्याखालोखाल काँग्रेसचे 21 सदस्य असून, भाजपचे 12 सदस्य आहेत. विधान परिषदेचे सभापतीपद मिळावं यासाठी राष्ट्रवादीनं भाजपच्या साथीनं शिवाजीराव देशमुखांविरोधात अविश्वास ठराव मंजूर करून घेतला. त्यामुळे त्यांना हे पद सोडावं लागलं होतं. या राजकीय खेळीची शिवसेने तीव्र वरोध होता. त्यामुळेच अविश्वास ठरावाच्या वेळी सेनेने सभात्याग केला.

दरम्यान, विधानपरिषद सभापतीच्या पदाची उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत उद्या आहे. आता उद्या कोणते पक्ष उमेदवारी मागे घेतात, त्यावरून सभापती कोण याचा अंदाज घेता येणार आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 19, 2015 02:21 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close