S M L

कांदा करू शकतो वांदा

5 ऑक्टोबर ऐन निवडणुकीच्या तोंडावर कांद्याचे भाव वाढले आहेत. एरवी आठ ते दहा रुपये किलोने मिळाणारा कांदा आता दुपटीने महाग झाला आहे. उशीरा आलेला पाउस आणि सलग चार दिवस सुट्यांमुळे बाजार समितीचे व्यवहार बंद होते. त्यामुळे किरकोळ बाजारातही कांद्याचे भाव वाढले होते. त्याचबरोबर दक्षिणेकडे पावसामुळे कांद्याचं नुकसान झालं आहे. त्यामुळे राज्यातला कांदा तिथे मोठ्या प्रमाणावर पाठवला गेला. याचा परिणाम म्हणून मुंबई आणि पुण्याच्या बाजारातही कांद्याचे भाव अचानक वाढले आहेत. निवडणुकांचा प्रचार संपायला फक्त सहा दिवस बाकी असतानाच कांद्याचे भाव वाढले आहेत. पंधरा वर्षांपूर्वी याच कांद्यानं तीन राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या डोळ्यात पाणी आणलं होतं आणि आता हे भाव असेच वाढले तर नाशिकचा कांदा पुन्हा एकदा सत्ताधार्‍यांच्या डोळ्यात पाणी आणेल. सध्या बाजारात येत असलेला कांदा हा साठवून ठेवलेला उन्हाळ कांदा आहे. पाऊस उशीरा झाल्यानं कांद्याचा नवा हंगाम यायला तीन महिने उशीर होणार आहे. त्यामुळे ग्राहकांना अजून काही दिवस या चढ्या भावाला सामोरं जावच लागेल. ग्राहकांची नाराजी आणि कमी पावसानं कांदा उत्पादक नाराज या दुहेरी संकटाला सत्ताधारी आचारसंहितेच्या काळात कसं तोंड देणार हे पाहण्याजोगं असेल.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 5, 2009 01:50 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 5, 2009 01:50 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close