S M L

युतीला कल्याणमध्ये बंडखोरांचं ग्रहण

5 ऑक्टोबर युतीमध्ये कोणत्याही प्रकारचा वाद नसल्याचा दावा सेनाभाजपकडुन करण्यात येत आहे. मात्र अनेक लढती अशा आहेत जिथे शिवसेना आणि भाजपचे उमेदवार एकमेकांच्या विरोधात कंबर कसून उभे राहिलेत. त्याचच एक उदाहरण म्हणजे कल्याण-डोंबिवलीच्या जागा या ठिकाणची लढत शिवसेना विरुद्ध भाजप अशी रंगेल असं चित्र आहे. कल्याण पश्चिमची जागा शिवसेनेच्या वाट्याला आली. शिवसेननं राजेंद्र देवळेकर यांना उमेदवारी दिली पण भाजपचे नाराज नगरसेवक मंगेश गायकर, यांनी कल्याण पश्चिममधून बंडखोरी केली. मंगेश गायकरांना भाजपच्या कार्यकर्त्यांनी छुपा पाठिंबा दिला आहे. त्याची परत फेड म्हणून शिवसेनेला डोईजड झालेले डोंबिवली मतदार संघातील भाजपचे उमेदवार रविंद्र चव्हाण यांना शिवसेनेनं मदत न करण्याचा पवित्रा घेतला आहे. तर युतीत सगळं आलबेल असल्याचा दावा रविंद्र चव्हाण यांनी केला आहे. कल्याण डोंबिवली हा युतीचा बालेकिल्ला आहे. पण यावेळी हा बालेकिल्ला टीकवणं कठीण दिसतोय. कारण, दोन्ही पक्षांनी आप आपल्या स्वतंत्र चुली मांडल्यात, त्यामुळे युतीचा हा गड ढासाळतोय की काय अशी परिस्थीत निर्माण झाली आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांच्या असहकार आंदोलनाचा फटका, शिवसेनेच्या उमेदवारंना बसणार हे शिवसेनेच्या लक्षात आलं. त्याची भरपाई म्हणून काल पर्यंत एकमेकांचे पक्के हाडवैरी असलेले पुंडलीक म्हात्रे आणि रमेश म्हात्रे यांना एकत्र आणलं आहे. त्यांच्या एकत्र येण्यानं या तीन मतदार संघात शिवसेनेला फायदा होईल असं शिवसेनेच्या पक्षश्रेष्ठींना वाटत आहे. पण कार्यकर्त्यांची मन जुळली नाहीत तर दोघाच्या भांडणात तिसर्‍याचा लाभ होणार हे नक्की.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 5, 2009 01:53 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 5, 2009 01:53 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close