S M L

कोण होणार सभापती ?

Sachin Salve | Updated On: Mar 20, 2015 12:41 PM IST

vidhan19 मार्च : विधानपरिषद सभापती पदाची निवडणूक आता चुरशीची ठरलीय. तीनही पक्षांनी उमेदवार रिंगणात उतरवल्यानं शह-काटशहाचं राजकारण रंगलंय. शिवसेनेच्या नीलम गोर्‍हे यांनी सभापतीपदासाठी अर्ज दाखल केलाय.

राष्ट्रवादीकडून रामराजे निंबाळकरांनी अर्ज भरलाय. तर काँग्रेसकडून शरद रणपिसेंनी अर्ज दाखल केलाय. श्रीकांत देशपांडे अपक्ष म्हणून रिंगणात उतरलेत. त्यामुळे ही निवडणूक प्रतिष्ठेची बनवलीय. विधान परिषदेत शिवसेनेची सदस्य संख्या कमी आहे.

तरीही भाजपला शह देण्यासाठी शिवसेनेनं निवडणुकीत उडी घेतलीय.भाजप-राष्ट्रवादी युती उघडी पाडण्यासाठी सेनेची खेळी असल्याचं बोललं जातंय. अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत शुक्रवारची आहे. त्यामुळे उद्या कोणते पक्ष उमेदवारी मागे घेतात, त्यावरून सभापती कोण याचा अंदाज येणार आहे.

 

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 19, 2015 11:24 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close