S M L

विधान परिषद सभापतीपदी रामराजे निंबाळकर बिनविरोध

Samruddha Bhambure | Updated On: Mar 20, 2015 03:30 PM IST

phaltan_RAJA_BAHADUR_SHRIMANT_RAMRAJE_NAIK_NIMBALKAR_120 मार्च : नाट्यमय घडामोडीनंतर विधानपरिषदेच्या सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य रामराजे नाईक निंबाळकर यांची आज बिनविरोध निवड झाली आहे. काँग्रेस उमेदवाराची माघार आणि सत्ताधारी भाजपा-शिवसेनेचा मतदानावरील बहिष्काराने सभापतीपदाची निवडणूक बिनविरोध झाली.

मतदानाला काही तासांचा अवधी शिल्लक असताना शिवसेनेच्या सभापतीपदाच्या उमेदवार डॉ. निलम गोर्‍हे यांनी उद्धव ठाकरेंच्या आदेशावरून आपला अर्ज मागे घेतला. त्यानंतर महसूलमंत्री एकनाथ खडसे आणि पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी सभापती निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय जाहीर केला. त्यानंतर काँग्रेसचे उमेदवार शरद रणपिसे यांनीही आपला अर्ज मागे घेतला. त्यामुळे राष्ट्रवादीच्या रामराजे नाईक निंबाळकरांचा सभापतीपदाच्या निवडीचा मार्ग मोकळा झाला.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 20, 2015 12:30 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close