S M L

पाकला घरचा रस्ता, सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलिया-भारत भिडणार

Sachin Salve | Updated On: Mar 20, 2015 05:53 PM IST

पाकला घरचा रस्ता, सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलिया-भारत भिडणार

aus vs pak20 मार्च : वर्ल्ड कपच्या तिसर्‍या क्वार्टरफायनलमध्ये ऑस्ट्रेलियानं पाकिस्तानचा 6 विकेटनं पराभव करून अखेरचा मौकाही हिरावून घेतलाय. त्यामुळे आता सेमीफायनलमध्ये टीम इंडियाचा मुकाबला ऑस्ट्रेलियाशी रंगणार आहे. सलग सातव्यांदा ऑस्ट्रेलियन टीम सेमीफायनलमध्ये पोहचलीये.

पाकिस्ताननं टॉस जिंकून पहिली बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. पण ऑस्ट्रेलियानं पाकिस्तानच्या बॅट्समनना सुरुवातीपासूनच दणके दिले. पाकिस्तानची सुरुवात आजही खराब झाली आणि ठराविक अंतरानं पाकिस्तानच्या विकेट पडत राहिल्या. पाकिस्तानतर्फे हॅरिस सोहेलनं सर्वाधिक 41 रन्स केले. पण त्यांचा एकही बॅट्समन मोठा स्कोर करु शकला नाही. अवघा पाक संघ कसाबसा 213 रन्सपर्यंत मजल मारू शकला. आणि पाकिस्ताननं ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 214 रन्सचं टार्गेट उभारलं.

ऑस्ट्रेलियातर्फे हेझलवूडनं 4, स्टार्कनं 2 तर मॅक्सवेलनंही 2 विकेट घेतल्या. 214 धावांचा पाठलाग करणार्‍या ऑस्ट्रेलियाची सुरवातही खराब झाली. त्यांचे सलामीला आलेले बॅटसमन झटपट पॅव्हेलियनमध्ये परतले. पण त्यानंतर स्टीव्ह स्मिथ आणि शेन वॉटसननं तुफान फटकेबाजी करत ऑस्ट्रेलियाची इनिंग सावरली. स्टीव्ह स्मिथनं 65 रन्स ठोकले. तर वॉटसननंही शानदार हाफ सेंच्युरी ठोकली. स्मिथ आऊट झाल्यानंतर आलेल्या ग्लेन मॅक्सवेलनं वॉटसनबरोबर फटकेबाजी करत ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला आणि ऑस्ट्रेलियानं सेमीफायनलमध्ये जागा

पटकावली.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 20, 2015 05:50 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close