S M L

सेना ढोंगी पक्ष, सत्तेत असून आंदोलन का करता ? -राणे

Sachin Salve | Updated On: Mar 20, 2015 06:11 PM IST

uddhav and rane20 मार्च : शिवसेना हा ढोंगी पक्ष आहे. सत्तेत असूनही आंदोलन कसं काय करू शकता. ही जनतेची फसवणूक आहे अशी जळजळीत टीका काँग्रेस नेते नारायण राणे यांनी केलीये. कणकवली तालुक्यातल्या ओसरगाव इथल्या महिला जिल्हा भवनमध्ये सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कार्यकारणीची बैठक झाली. यावेळी ते बोलत होते.

जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाच्या विरोधात शिवसेनेनं गुरुवारी रत्नागिरीत आंदोलन केलं होतं. सेनेच्या या आंदोलनाचा नारायण राणे यांनी खरपूस समाचार घेतला. सत्तेत असूनही शिवसेनेला आंदोलन करावं लागतं हा शिवसेनेचा नाकर्तेपणा असल्याचा टोलाही राणेंनी लगावला. तर यावेळी उपस्थित असलेल्या माजी खासदार निलेश राणे यांनीही या आंदोलनावरून शिवसेनेला लक्ष केलं. विशेष म्हणजे, नारायण राणे यांनी वांद्रे पोटनिवडणूक लढवण्याचा निर्णय जाहीर केलाय. वांद्र्यात शिवसेनेचे दिवंगत नेते बाळा सावंत यांच्या निधनामुळे निवडणूक होत आहे. वांद्रे हा सेनेचा बालेकिल्ला समजला जातो. त्यामुळे या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने राणे विरुद्ध शिवसेना असा सामना दिवसेंदिवस रंगत चाललाय.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 20, 2015 06:11 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close