S M L

सिद्धराम म्हेत्रे यांचा जामीन अर्ज फेटाळला

6 ऑक्टोबर अक्कलकोट गोळीबार प्रकरणी सिद्धराम म्हेत्रे यांचा अटकपूर्व जामीन हायकार्टानं फेटाळला आहे. त्यामुळे आता त्यांना कुठल्याही क्षणी अटक होऊ शकते. सोलापूर सेशन कोर्टानं अर्ज फेटाळल्या नंतर त्यांनी मंुबई हायकोर्टात धाव घेतली होती. सिध्दराम म्हेत्रे यांच्यासह त्याचे भाऊ शंकर म्हेत्रे यांच्यावर खुनाचा आरोप आहे. या प्रकरणी शंकर म्हेत्रे यांना सोलापूर पोलिसांनी अटक केली आहे. अक्कलकोट शेगाव येथे 26 सप्टेंबर रोजी भाजपच्या प्रचार सभेत झालेल्या गोळाबारात भाजपचा कार्यकर्ता ठार झाला होता. हा हल्ला सिध्दराम म्हेत्रे याच्या सांगण्यावरूनच करण्यात आला अशी पोलिसात तक्रार केल्यानं म्हेत्रे भावावर हा खुनाचा आरोप ठेवण्यात आला आहे. सिध्दराम म्हेत्रे अक्कलकोट मधून काँग्रेसचे उमेदवार आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 6, 2009 10:20 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 6, 2009 10:20 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close