S M L

काश्मिरमध्ये दहशतवादी हल्ल्यात सातार्‍यातील सूरज मोहिते शहीद

Sachin Salve | Updated On: Mar 20, 2015 10:35 PM IST

काश्मिरमध्ये दहशतवादी हल्ल्यात सातार्‍यातील सूरज मोहिते शहीद

suraj mohite20 मार्च : जम्मू-काश्मीरमधल्या कथुआमध्ये आज ( शुक्रवारी) सकाळी दहशतवाद्यांनी हल्ला केला. दहशतवाद्यांनी एका पोलीस स्टेशनवर हल्ला केला होता. या हल्ल्यामध्ये सातार्‍याचे सूरज मोहिते शहीद झाले. या ऑपरेशनमध्ये 2 अतिरेक्यांना ठार करण्यात आलं, तर सीआरपीएफचा 1 जवान आणि जम्मू काश्मीर पोलीस दलाचा एक जवान शहीद झाला. सूरज मोहिते हा सीआरपीएफच्या तुकडीत सामील होता. सीआरपीएफच्या 121व्या बटालियनमधील ई कंपनीत कॉन्स्टेबलच्या हुद्द्यावर सूरज मोहिते कार्यरत होता. सूरज हा सातारा जिल्ह्यातील वाईजवळच्या सिद्धनाथ वाडी इथले रहिवासी असून त्यांचं पार्थिव उद्या दुपारी 12 नंतर वाईमध्ये आणण्यात येणार आहे.

सकाळी सहाच्या सुमारास 3 दहशतवाद्यांनी राजबाग पोलीस ठाण्यावर सशस्त्र हल्ला केला. दहशतवाद्यांनी पोलीस ठाण्यात घुसून पोलिसांवर गोळीबार करण्यास सुरूवात केली. या वेळी पोलिसांनीही दहशतवाद्यांनी चोख प्रत्त्युतर दिलं. या धुमश्चक्रीत 1 पोलीस शहीद झाले. तर 2 दहशतवाद्यांना ठार मारण्यात आलं. या चकमकीत सीआरपीएफचा 1 जवान शहीद झाला. या चकमकीमुळे पठाणकोट हायबे बंद करण्यात आला होता.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 20, 2015 10:22 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close