S M L

वाघोबाच्या घरात हवश्या नवश्यांची घुसखोरी

Sachin Salve | Updated On: Mar 21, 2015 03:09 PM IST

वाघोबाच्या घरात हवश्या नवश्यांची घुसखोरी

21 मार्च : चंद्रपूरच्या ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्पात पर्यटनाचे नियम धाब्यावर बसवून राञी अवैध घुसखोरी केल्याचा प्रकार उघड झालाय. या संदर्भात कारवाई करण्याचे आदेश वनमंञी सुधीर मुनगंटीवार यानी दिले आहेत. नियमाप्रमाणे राञीच्या वेळेला संध्याकाळी सहानंतर व्याघ्र प्रकल्पात जिप्सी घेऊन जात येत नाही. मात्र तीन जिप्सीमध्ये काही पर्यटक रात्रीच्या वेळी घुसले इतकंच नव्हे तर जंगलात वाघ आणि बछडयाच्या मागे गाडया फिरवून त्रास देण्याचा प्रयत्न या अवैध पर्यटकानी केलाय. रात्रीच्या अवैध पर्यटनाचा व्हिडिओ वायरल झाल्यानंतर वनविभागाने आता या जिप्सी प्रकरणाची चौकशी सुरू केलीये. या जिप्सी वाहन चालकांचे परवाने निलंबित करण्यासोबतच या पर्यटकावरही गुन्हे दाखल करण्यात येणार आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 21, 2015 11:16 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close