S M L

तृप्ती माळवींचं नगरसेवकपदही जाणार ?

Sachin Salve | Updated On: Mar 21, 2015 11:25 AM IST

Trupti-Malvi21 मार्च : कोल्हापूरच्या महापौर तृप्ती माळवी या लाच प्रकरणी आता आणखी अडचणीत येण्याची शक्यता आहे. शुक्रवारी कोल्हापूर महापालिकेमध्ये महापौर माळवी यांच्या नगरसेवक पदावर कारवाई व्हावी असा ठराव नगरसेवकांनी संमत केलाय.

सभेवेळी सर्वपक्षीय नगरसेवकांनी महापौरांचा निषेध म्हणून गळ्यात निषेधाचे फलक घातले होते. त्यानंतर विषयांनुसार ठराव संमत कऱण्यात आले. यामध्ये महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 13- 1 अ व ब नुसार माळवी यांच्या नगरसेवक पदावर कारवाई व्हावी असा ठराव हात उंचावून संमत करण्यात आला. यावेळी दोन्ही काँग्रेससह शिवसेना आणि भाजप जनसुराज्यच्या नगरसेवकांनीही महापौरांविरोधात मतदान केलं. तर सर्वच पक्षांनी व्हिप जाहीर केल्यानं स्वतःच्या विरोधातल्या ठरावावर माळवी यांनाही हात वर करुन मतदान करावं लागलं. यावेळी उपस्थित असलेल्या 72 नगरसेवकांनी मतदान केलं. त्यामुळं आता या ठरावानुसार कारवाईचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवण्यात येणार असून राज्य सरकार आता पालिकेमधल्या या ठरावावर काय निर्णय घेतं हे पहावं लागणाराय.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 21, 2015 11:25 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close