S M L

शुभसंकेत?, सेना-मनसेची एकत्र शोभायात्रा

Sachin Salve | Updated On: Mar 21, 2015 05:52 PM IST

शुभसंकेत?, सेना-मनसेची एकत्र शोभायात्रा

21 मार्च : विधानसभा निवडणुकीच्या काळात शिवसेना आणि मनसे एकत्र येणार अशी धुराळं उडाली होती. पण आता पुन्हा एकदा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याचे शुभसंकेत मिळत आहे. आज गुढीपाडव्याच्या निमित्ताने सेना आणि मनसेनं एकत्र शोभायात्रा काढली. दोन्ही पक्ष एकत्र येणं हा शुभसंकेत आहे अशी सुचक प्रतिक्रिया सेनेचे खासदार गजानन किर्तीकर यांनी दिली.

शिवसेना आणि मनसे एकत्र येणार की, नाही याबाबत अनेक चर्चा रंगल्या. एवढंच नाहीतर राज आणि उद्धव या ना त्या कारणाने एकत्र ही एखाद्या कार्यक्रमात आले. पण, एकत्र येण्यावर दोन्ही नेत्यांनी हा विषय टाळलाय. शिवसेना सत्तेत सहभागी झाली असली तरी धुसफूस सुरूच आहे. आज गुढी पाडव्याच्या निम्मिताने दोन्ही पक्षांनी एकत्र येऊन शोभायात्रा काढली. याविषयी शिवसेनेचे खासदार गजानन किर्तीकर यांना विचारलं असता दोन्ही पक्षांनी एकत्र येणं हा शुभसंकेत आहे आणि ती काळाची गरज आहे असं सुचक वक्तव्य केलंय. राज-उद्धव एकत्र येण्याच्या चर्चांना ठराविक काळानंतर ऊत येतो. आता पुन्हा एकदा गजानन किर्तीकर यांनी दोन्ही पक्ष महाराष्ट्रात एकत्र आले तर मोठी ताकद दाखवू शकतो असंही किर्तीकर म्हणाले.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 21, 2015 05:33 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close