S M L

राणेंनी थोपटले दंड; सेनेला घाबरत नाही,पोटनिवडणूक लढवणारच !

Sachin Salve | Updated On: Mar 21, 2015 09:32 PM IST

राणेंनी थोपटले दंड; सेनेला घाबरत नाही,पोटनिवडणूक लढवणारच !

21 मार्च : अखेर नारायण राणे यांनी आता उघड-उघडपणे शिवसेनेविरोधात दंड थोपटले असून वांद्रे पोटनिवडणूक लढवणारच अशी घोषणाच केली आहे. आपण शिवसेनेला टक्कर देणार असून मंगळवारी उमेदवारीचा अर्ज दाखल करणार आहे असंही राणे यांनी स्पष्ट केलं. राणेंच्या उमेदवारीबाबत लवकरच काँग्रेस औपचारिक घोषणा करणार आहे.

शिवसेनेचे दिवंगत नेते बाळा सावंत यांच्या निधनामुळे वांद्रे मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. या पोटनिवडणुकीत भाजपने उमेदवार न देण्याचा निर्णय घेतलाय. तर राष्ट्रवादीचा निर्णय झालेला नाहीये. पण, काँग्रेसने नारायण राणे यांची नाराजी दूर करण्यासाठी वांद्रे पोटनिवडणुकीची ऑफर दिलीये. राणेंनी आजही ऑफर अधिकृतपणे स्वीकारली असल्याची घोषणा केलीये. गेल्या दोन दिवसांपासून राणेंनी शिवसेना डिवचण्यासाठी वादग्रस्त विधान केली. पण, सेनेकडून कोणताच प्रतिसाद न मिळाल्यामुळे अखेर राणेंनी पोटनिवडणुकीत उडी घेतलीये.

मी, अलीकडेच प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याशी चर्चा केली आणि पोटनिवडणूक लढवण्यासाठी तयार आहे असा निर्णय सांगितलाय असं राणेंनी स्पष्ट केलं. निवडणुकीसाठी मला फक्त 5 दिवस पुरेसे आहे. वांद्र्यात फक्त मातोश्री आहे. पण मी, शिवसेना घाबरत नाही, ना एमआयएमला. मी जिंकण्यासाठी लढतोय आणि जिंकणारच असा विश्वास राणेंनी व्यक्त केला.

विजयाची मोर्चेबांधणी करण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार यांचीही भेट घेणार आहे. राष्ट्रवादी या विधानसभा क्षेत्रासाठी उमेदवार देणार नाही, अशी आशा त्यांनी व्यक्त केलीय.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 21, 2015 08:10 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close