S M L

औरंगाबादच्या नामकरणाचं राजकारण

Samruddha Bhambure | Updated On: Mar 22, 2015 06:25 PM IST

 औरंगाबादच्या नामकरणाचं राजकारण

22  मार्च : औरंगाबाद महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादच्या नामकरणाचं राजकारण व्हायला सुरुवात झाली आहे. औरंगाबादचं नाव बदलून संभाजीनगर करा या मागणीसाठी शिवसेना आक्रमक झाली आहे.

औरंगाबादचं नाव संभाजीनगर व्हावं अशी मागणी शिवसेनेचे नेते आणि औरंगाबादचे पालकमंत्री रामदास कदम यांनी मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे केली आहे. येत्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत प्रस्ताव मांडण्याची विनंतीही केली असल्याचं रामदास कदम यांनी सांगितलं आहे.

त्यामुळे, आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीत औरंगाबाद की संभाजीनगर हा मुद्दा रंगण्याची चिन्हे आहेत. तसंच शिवसेनेची ही मागणी भाजप मान्य करणार का याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 22, 2015 06:22 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close