S M L

रखडलेल्या सेझसाठी 'स्वाभिमानी शेतकरी'ची पदयात्रा

Samruddha Bhambure | Updated On: Mar 23, 2015 10:20 AM IST

रखडलेल्या सेझसाठी 'स्वाभिमानी शेतकरी'ची पदयात्रा

23  मार्च : रखडलेल्या सेझच्या जमिनी शेतकर्‍यांना परत कराव्यात, तसंच शेतकर्‍यांच्या सातबारा उतार्‍यावर संपादनासाठी मारण्यात आलेले शेरे त्वरित कमी करावेत, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे आज (सोमवारी) राजगुरूनगर येथून बाधित शेतकर्‍यांची पदयात्रा काढण्यात आली आहे. राजगुरूनगर येथून ही पदयात्रा निघेल. तिचा पहिला मुक्काम आज आळंदीत असणार आहे. त्यानंतर पदयात्रा उद्या (मंगळवारी) पुण्यात येणार आहे.

तत्कालीन सरकारने 2013 मध्ये जो कायदा केला होता, तो सर्व संबंधित घटकांशी चर्चा करून केला. मात्र, या सरकारने त्यामध्ये बदल केला. शेतकर्‍यांच्या जमिनी स्वस्तात घ्यायच्या आणि त्या उद्योगधंद्यांना जादा किमतीत द्यायच्या, असा काही लोकांचा नवीन धंदा तयार झाला आहे, असंही स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे.

शहीद दिनाचे निमित्त साधून केंद्र सरकारच्या भूमी भूसंपदान कायद्याच्या विरोधात 'शेती वाचवा, शेतकरी वाचवा' या आंदोलनाची ही सुरुवात आहे. 8 वर्षांपूर्वी सेझच्या नावाखाली खेडमधल्या राजगुरूनगर इथल्या 17 गावांमधल्या जमिनींचं संपादन करण्यात आलं होतं. पण नियमाप्रमाणे 5 वर्षांमध्ये सेझचा प्रकल्प पूर्ण झाला नाही, त्यामुळे ती जमीन प्रकल्पबाधितांना परत मिळायला हवी, अशी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी आहे. ठाकरवाडी या गावातले शेतकरीही या प्रकल्पावर संतापले आहेत. या जमिनींच्या मोबदल्यात शेतकरी आणि आदिवासींना कोणतंही पॅकेज मिळालं नसल्याची तक्रार या प्रकल्पबाधितांनी केलीये. ठाकरवाडीतल्या जमिनी संपादित केल्यानंतर या शेतकरी आणि आदिवासींना घरं देण्यात आली होती. मात्र ती लहान आहेत आणि त्यांना तडे गेलेत. गावकर्‍यांना पाण्याची टाकी बांधून दिली पण आजही इथल्या महिलांना पाणी आणण्यासाठी दूर जावं लागतं. इथे बांधण्यात आलेले रस्ते दगडगोट्यांचे आहेत. इथे बसवलेले सोलरही थोड्याच दिवसांत बंद पडले.जमिनींसाठी शेतकर्‍यांना आकर्षक पॅकेजचं आश्वासन दिलं होतं. पण असं कोणतंही पॅकेजही मिळालेलं नाही. त्यामुळे आता या प्रश्नी आक्रमक भूमिका घेण्याचा निर्णय स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं घेतला आहे. या मोर्चात इथले गावकरीही खेड ते पुणे पदयात्रेमध्ये सहभागी झाले आहेत.

दरम्यान, 'मन की बात'मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या मनातील बात सांगितली. शेतकर्‍यांच्या मनातील नाही, अशा शब्दांत आज भाजपचे मित्रपक्ष असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी पंतप्रधानांवरच टीका केली. 'मन की बात'मध्ये त्यांनी कळीचा मुद्दा बाजूलाच ठेवला. जमिनी हव्या आहेत तर शेतकर्‍यांशी थेट बोलण्यास का घाबरता, असा सवालही त्यांनी यावेळी केला.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 23, 2015 10:20 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close