S M L

नक्षलवाद्यांच्या गोळीबारात महाराष्ट्राचे दोन पोलीस शहीद

Samruddha Bhambure | Updated On: Mar 23, 2015 03:30 PM IST

नक्षलवाद्यांच्या गोळीबारात महाराष्ट्राचे दोन पोलीस शहीद

23  मार्च :  छत्तीसगड सीमेलगत गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत महाराष्ट्राचे दोन पोलीस जवान शहीद झाले. तर, एक जवान गंभीर जखमी झाला.

सी-60 पथकामध्ये हे जवान कार्यरत होते. काल छत्तसिगड सीमेलगतच्या एटापल्ली तालुक्यातील जंगलात सी-60 पथकाकडून नक्षलवाद्यांच्या विरोधात सुरू असलेल्या कोम्बींग ऑपरेशन करण्यात येत होते. त्यावेळी दबा धरून बसलेल्या नक्षलवाद्यांकडून अचानक गोळीबारास सुरूवात झाली. त्यात दोहे आत्राम आणि स्वरूप अमृतकर हे पोलीस कमांडो ठार झाले तर दिनेश हिचामी जखमी झाला होता. नक्षलवाद्यांचे लोकेशन असल्याने तसंच अंधार झाल्याने बचावकार्यासाठी हॅलीकॅप्टर जाऊ शकल नाही, आज सकाळी जवानांचे मृतदेह आणि जखमी जवानाला हॅलीकॅप्टरच्या मदतीने बाहेर काढण्यात आलं.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 23, 2015 12:50 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close