S M L

औरंगाबाद पालिकेसाठी सेना-भाजपची गुप्त बैठक

Sachin Salve | Updated On: Mar 23, 2015 05:50 PM IST

Image img_236062_bjpandsena_240x180.jpg23 मार्च : औरंगाबाद महापालिकेच्या निवडणुकीच्या राजकीय हालचाली सुरू झाल्यात. शिवसेना आणि भाजप युतीच्या स्थानिक नेत्यांच्या स्थानिक पातळीवर वाटाघाटी सुरू आहेत. रविवारी रात्री सेना भाजपची गोपनीय बैठक झाली. शिवसेनेनं भाजपसमोर 55-45 असा प्रस्ताव ठेवलाय, तर भाजप निम्या जागांवर अडलीये.

मागील निवडणुकीत 60-40 असा फॉर्म्युला वापरण्यात आला होता. मात्र, आता भाजपच्या महत्त्वाकांक्षा वाढल्यात. अनेक नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय. त्यामुळे भाजपला जास्त जागा हव्यात. शिवसेनेनं युतीसाठी प्रस्ताव दिलाय, पण भाजप मात्र 50 टक्के जागांवर अडून बसलीये. दरम्यान, औरंगाबाद मध्ये वार्ड आरक्षण जसेच्या तसे राहणार आहेत. वार्ड आरक्षणच्या विरोधात 4 जणांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. ती याचिका हायकोर्टाने फेटाळलीये.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 23, 2015 05:50 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close