S M L

वांद्रे पोटनिवडणुकीत एमआयएमची उडी

Sachin Salve | Updated On: Mar 23, 2015 07:09 PM IST

mim_news23 मार्च : वांद्रे पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीचा आखाडा आता चांगलाच तापला असून या निवडणुकीत आता एमआयएमने उडी घेतलीये. पोटनिवडणूक एमआयएम लढवणार अशी घोषणा एमआयएमचे आमदार वारिस पठाण यांनी केली आहे. एमआयएमकडून सिराज खान उमेदवार असणार आहे.

तर दुसरीकडे आज पोटनिवडणुकीसाठी शिवसेनेच्या उमेदवार तृप्ती प्रकाश सावंत यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय. त्यांच्या समर्थनार्थ शिवसेनेने जोरदार शक्तीप्रदर्शन केलं. या पोटनिवडणुकीच्या निमित्तानं काँग्रेसचे नेते नारायण राणे यांच्या विरोधात शिवसेना आणि भाजपची एकजूट झाल्याचं चित्र दिसत आहे.

विशेष म्हणजे कुडाळ विधानसभा मतदारसंघातून नारायण राणे यांना हरवून जायंट किलर ठरलेले वैभव नाईक आज तृप्ती सावंत यांच्या प्रचारासाठी मैदानात उतरलेत. नारायण राणे यांना पुन्हा एकदा शिवसेनेचं बाळकडू पाजणार असा निर्धार वैभव नाईक यांनी केलाय. नारायण राणे उद्या आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. आता शिवसेना विरुद्ध नारायण राणे असा आखडा रंगलाय. भाजप आणि राष्ट्रवादीने उमेदवार देणार नसल्याची घोषणा केली. पण आता एमआयएमने निवडणूक लढवण्याची घोषणा केलीये.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 23, 2015 07:09 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close