S M L

गुटखा विक्री आता ठरणार अजामिनपात्र गुन्हा

Sachin Salve | Updated On: Mar 23, 2015 09:05 PM IST

गुटखा विक्री आता ठरणार अजामिनपात्र गुन्हा

gutka ban3323 मार्च : गुटख्यावर बंदी असतांनाही चोरीछुपे गुटखा विक्री करण्यावर आता टाच येणार आहे. गुटखा विक्री आता अजामिनपात्र गुन्हा ठरणार आहे.

एवढंच नाहीतर गुटखा विकणार्‍याला दहा वर्षांची शिक्षा ठोठावण्यात येणार आहे अशी घोषणा अन्न आणि औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट यांनी विधानसभेत केली.

तसंच लवकरच याबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे. आघाडी सरकारनं राज्यात गुटखाविक्रीवर बंदी घातली होती.

पण चोरून गुटख्याची विक्री सुरूच होती. त्यामुळे आता अधिक कडक शिक्षेची घोषणा सरकारनं केलीय.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 23, 2015 09:05 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close