S M L

न्यूझीलंडची दक्षिण आफ्रिकेवर मात, फायनलमध्ये धडक

Samruddha Bhambure | Updated On: Mar 24, 2015 06:03 PM IST

न्यूझीलंडची दक्षिण आफ्रिकेवर मात, फायनलमध्ये धडक

24 मार्च : थरारक लढतीत न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळवत वर्ल्डकपच्या फायनल्समध्ये दणक्यात प्रवेश केला आहे. शेवटच्या क्षणापर्यंत श्वास रोखून धरायला लावणार्‍या या मॅचमध्ये न्यूझीलंडने आफ्रिकेवर 4 विकेट राखून विजय मिळवला आहे. या विजयासह न्यूझीलंडने पहिल्यांदाच वर्ल्डकप फायनलमध्ये धडक मारली आहे. तर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान संपुष्टात आलं आहे.

न्यूझीलंडने सुरुवात तर दणक्यात केली पण शानदार हाफ सेंच्युरीनंतर ब्रँडन मॅकलम 59 रन्सवर पॅव्हेलियनमध्ये परतला आणि त्यानंतर झटपट एक रन चोरण्याच्या नादात मार्टिन ग्युप्टिल 34 रन्सवर रन आऊट होऊन पॅव्हेलियनमध्ये परतला. रॉस टेलरही 30 रन्सवर आऊट झाला. टेलरनंतर ग्रँट इलियॉट आणि कोरी अँडरसनने न्यूझीलंडची इनिंग सावरली. इलियॉटनं 84 रन्स ठोकले तर अँडरसनने 58 रन्स करत न्यूझीलंडला थरारक विजय मिळवून दिला.

टॉस जिंकून दक्षिण आफ्रिकेनं पहिली बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला पण न्यूझीलंडने सुरुवातीपासून दक्षिण आफ्रिकेला दणके दिले. आमला आणि क्विंटन डी कॉक ढटपट आऊट झाले. त्यानंतर आलेल्या फॉफ ड्यु प्लेसी आणि रायली रुसोने आफ्रिकेची इनिंग सावरली. पहिल्या 25 ओव्हर्समध्ये न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेला चांगलंच रोखलं त्यानंतर सुरू झाला तो ड्यु प्लेसी आणि डिव्हिलिअर्सचा धडाका. ड्यु प्लेसीने 82 रन्स तडकावले पण तो आऊट झाल्यानंतर खरी कमाल केली ती डेव्हिड मिलरने. डिव्हिलिअर्सने शानदार हाफ सेंच्युरी ठोकली तर मिलरने 18 बॉल्समध्ये 49 रन्स तडकावले. मॅचमध्ये पावसाचा व्यत्यय आल्यानंतर मॅच 43 ओव्हर्सची केली गेली आणि आफ्रिकेने या 43 ओव्हर्समध्ये 281 रन्स ठोकले. पण डकवर्थ ल्यूईस नियमानुसार न्यूझीलंडसमोर विजयासाठी 298 रन्सचं आव्हान ठेवलं गेलं.

यूझीलंडच्या विजयाचा ग्रँट एलियट हा खरा शिल्पकार ठरला. न्यूझीलंडला 2 चेंडूत 5 धावांची गरज असताना, एलिएटने मॉर्नी मॉर्केलला थेट सिक्सर ठोकला आणि न्यूझीलंडला फायनलचं तिकीट मिळवून दिलं.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 24, 2015 04:28 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close