S M L

फ्रान्समध्ये विमानाला अपघात, 148 प्रवासी दगावल्याची भीती

Samruddha Bhambure | Updated On: Mar 24, 2015 06:26 PM IST

फ्रान्समध्ये विमानाला अपघात, 148 प्रवासी दगावल्याची भीती

24 मार्च : बार्सिलोनाहून डसेलडॉर्फकडे निघालेले जर्मनविंग्जचे एअरबस ए 320 विमानाला आज (मंगळवारी) दक्षिण फ्रान्समध्ये भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 148 जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. विमानामध्ये 142 प्रवासी, 2 वैमानिक आणि चार क्रू मेंबर होते.

फ्रान्सचे अध्यक्ष फ्रान्सवा ओलौंद यांनी विमानातील 148 जणांपैकी कोणीही बचावला असण्याची शक्यता नसल्याचे स्पष्ट केलं आहे. हा अपघान नेमका कशामुळे झाला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, अपघाताची स्थिती पाहता कोणीही वाचले असण्याची शक्यता नसल्याचे त्यांनी सांगितले. फ्रान्सच्या दक्षिण भागात अपघात ज्या ठिकाणी झाला आहे, तिथपर्यंत पोहोचून लवकर मदतकार्य सुरू करणंही अवघड असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

फ्रान्सच्या डिग्ने आल्प्सजवळ विमानाचे अवशेष सापडले आहेत. स्थानिक वेळेनुसार सकाळी 9.39 मिनिटांनी विमान रडारहून बेपत्ता झालं. हे विमान 6800 फुटांच्या उंचीवर सुरु उड्डाण करत होते.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 24, 2015 06:26 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close