S M L

नवीन पनवेल चर्चवरील हल्ल्याप्रकरणी चार जणांना अटक

Samruddha Bhambure | Updated On: Mar 24, 2015 09:55 PM IST

. panvel saint george churchjpg

24 मार्च : नवीन पनवेल इथल्या सेंट जॉर्ज चर्चवर झालेल्या दगडफेकप्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारवर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. या आरोपींकडून त्यांनी हल्ला करताना घातलेले शर्ट आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. या हल्ल्यामागे कोणतंही धार्मिक कारण नसल्याची माहिती पोलिसांच्या तपासातून समोर आली आहे.

हल्लेखोरांनी नवीन पनवेल इथल्या उड्डाण पुलाजवळच्या सेंट जॉर्ज कॅथलिक चर्चवर ही दगडफेक केली होती. त्यानंतर हे हल्लेखोर पसार झाले होते. रात्री दीड वाजता ही घटना घडली. दगडफेक करणार्‍या तिघांनीही आपल्या तोंडाला कापड गुंडाळले होते. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेर्‍यात ही घटना कैद झाली होती. याप्रकरणी खांदेश्वर पोलीस स्थानकात अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी खांदेश्वर पोलीस स्थानकात अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला होता. या सीसीटीव्हीच्या आधारे पोलीसांनी शोध घेत चार जणांना अटक केली.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 24, 2015 09:55 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close