S M L

अंधेरीत कमर्शियल बिल्डिंगला लागलेली आग आटोक्यात, जिवितहानी नाही

Samruddha Bhambure | Updated On: Mar 25, 2015 05:03 PM IST

अंधेरीत कमर्शियल बिल्डिंगला लागलेली आग आटोक्यात, जिवितहानी नाही

25 मार्च : अंधरीच्या चकाला भागात असलेल्या कनाकिया या सात मजली कमर्शियल बिल्डिंगला आज सकाळी अकराच्या सुमारास भीषण आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आणि आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

चकाला इथल्या नटराज स्टुडियो कंम्पाऊंडमध्ये कनाकिया नावाची सात मजली कमर्शियल बिल्डिंग आहे. या बिल्डिंगच्या दुसर्‍या मजल्यावर ही आग लागली. या बिल्डिंगमध्ये अनके ऑफिसेस आहेत. सकाळी अकराच्या सुमारास अचानक बिल्डिंगमधून धुराचे लोट येऊ लागले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 8 गाडया घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाच्या जवाणांना या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे. दरम्यान, आगीचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 25, 2015 12:27 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close