S M L

अपघातावेळी मी गाडी चालवतच नव्हतो - सलमान खान

Samruddha Bhambure | Updated On: Mar 27, 2015 08:47 PM IST

अपघातावेळी मी गाडी चालवतच नव्हतो - सलमान खान

27 मार्च : 'हिट अँण्ड रन' प्रकरणी अभिनेता सलमान खान याने शुक्रवारी कोर्टासमोर आपली बाजू मांडताना स्वत:वरचे सर्व आरोप फेटाळले आहेत. अपघात घडला त्यादिवशी मी दारू प्यायली नव्हतो. तसेच अपघाताच्या वेळी मी नाही, तर माझा ड्रायवर गाडी चालवत होता, असा दावाही सलमानने कोर्टात केला आहे.

सलमान खान आज (शुक्रवारी) सकाळी स्वत:ची बाजू मांडण्यासाठी न्यायालयात दाखल झाला. या प्रकरणाची सुनावणी अंतिम टप्प्यात असताना सलमान खानकडे त्याची बाजू मांडण्याची ही शेवटची संधी होती. सलमानने या सुनावणीत स्वतःवरील आरोप फेटाळून लावले.

मुंबईमध्ये 28 सप्टेंबर 2002 ला घडलेल्या या प्रकरणात सलमान खानच्या कारखाली चिरडून एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचा आरोप आहे. या घटनेत चार जणं जखमी झाले होते. या प्रकरणात सरकारी वकिलांनी आतापर्यंत 25 साक्षीदारांना कोर्टापुढे आणले असून अनेक पुरावेही सादर केले आहेत.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 27, 2015 06:05 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close