S M L

'हिट अँण्ड रन' प्रकरणातून सलमान खानला दिलासा?

Samruddha Bhambure | Updated On: Mar 30, 2015 04:03 PM IST

'हिट अँण्ड रन' प्रकरणातून सलमान खानला दिलासा?

30 मार्च : अभिनेता सलमान खान आरोपी असलेल्या 'हिट अँण्ड रन' प्रकरणाला सोमवारी नवं वळण मिळालं आहे. अपघातावेळी सलमान खान गाडी चालवत नव्हता तर मी चालवत होतो, अशी कबुली सलमान खानचा ड्रायव्हर अशोककुमार सिंहने कोर्टात दिली. त्यामुळे 'हिट अँण्ड रन' प्रकरणातून सलमान खानला दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

वांद्रे इथे 2002 साली घडलेल्या हिट अँड रन प्रकरणाची सुनावणी पुन्हा सुरू झाली असून आज सलमानचा ड्रायव्हर अशोक सिंग याची साक्ष घेण्यात आली. तेव्हा त्याने आपणच गाडी चालवत असल्याचे कबूल केले. मी पोलिसांनाही तोच जबाब दिला होता, मात्र ते आपलं काहीही ऐकण्यास तयार नव्हते असेही सिंग यांनी म्हटलं. या खटल्याची अंतिम सुनावणी एक एप्रिलपासून सुरू होणार आहे.

दरम्यान, सिंग यांच्या या कबुलीमुळे या प्रकरणाला नवीन वळण मिळण्याची चिन्हं आहेत. 2002 साली घडलेल्या या अपघातात एक जण ठार तर चार जण जखमी झाले होते.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 30, 2015 03:49 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close