S M L

अवकाळी पावसाचा डाळींना फटका

Samruddha Bhambure | Updated On: Mar 31, 2015 07:25 PM IST

अवकाळी पावसाचा डाळींना फटका

31 मार्च : रोजच्या जेवणाचा अविभाज्य घटक असलेल्या तूरडाळीला गेल्या काही महिन्यांमध्ये पडलेला अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा मोठा फटका बसला आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई परिसराला अन्नधान्याचा पुरवठा करणार्‍या वाशीतील घाऊक बाजारात तूरडाळीचे दर किलोमागे 88 रुपयांपर्यंत पोहोचल्याने किरकोळ बाजारात या डाळींच्या दराने थेट शंभरी गाठली आहे.

उत्तम प्रतीच्या तूरडाळीसाठी किरकोळ बाजारात 100 ते 105 रुपयांचा दर आकारला जात आहे. उडीद आणि मूगडाळीचे दरही गेल्या 15 दिवसांत वाढल्याने त्याचाही फटका बसत आहे.

गेल्या महिनाभरामध्ये राज्यभरात अवकाळी पाऊस आणि गारपीट झाल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. अकोला, अमरावती, वर्धा, सोलापूर, जालना, लातूर अशा भागांमध्ये मोठय़ा प्रमाणावर तूरडाळीचे उत्पादन होत असते. याशिवाय गुजरातच्या काही भागांमधून मुंबईच्या बाजारपेठेत डाळींची आवक होते. मात्र अवकाळी पावसामुळे या उत्पादनावर परिणाम झाला आहे.

डाळींचे घाऊक दर

  • तूरडाळ 88 रुपये, उडीदडाळ 86 रुपये किलो, मूगडाळ 100 रुपये किलो, सुटे मूग 90 रुपये किलो
  • डाळींच्या घाऊक दरांमध्ये गेल्या महिन्याच्या तुलनेत जास्त वाढ
  • अवकाळी पावसामुळे आवक घटल्याने ही वाढ झाल्याचा व्यापार्‍यांचा दावा
  • ज्वारी, बाजरी, गहू, तांदळाचे दर मात्र अजून नियंत्रणात

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 31, 2015 07:25 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close