S M L

काँग्रेसचे माजी आमदार सा. रे. पाटील यांचं निधन

Samruddha Bhambure | Updated On: Apr 1, 2015 06:20 PM IST

काँग्रेसचे माजी आमदार सा. रे. पाटील यांचं निधन

01 एप्रिल : काँग्रेसचे माजी आमदार आणि ज्येष्ठ नेते सा.रे. पाटील यांचं आज सकाळी निधन झालं. ते 94 वर्षांचे होते.

गेल्या काही दिवसांपासून पाटील यांच्यावर बेळगावमध्ये उपचार सुरू होते. पण आज सकाळीचं उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पाटील यांच्या इच्छेनुसार त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार न करता देहदान करण्यात आलं. त्यांच्या मृत्यूमुळे एक ज्येष्ठ आणि अनुभवी नेता हरपला, अशी हळहळ व्यक्त केली जातेय.

सा. रे. पाटील यांचा जन्म 11 डिसेंबर 1921 रोजी झाला. शिरोळ मतदार संघातून ते तीनवेळा आमदार झाले. 1957 ते 1962 या काळात ते पहिल्यांदा आमदार झाले. त्यानंतर 1999 ते 2004 साली आणि 2009 ते 2014 या काळात ते पुन्हा एकदा आमदार म्हणून निवडून आले. यादरम्यान पाटील यांनी अनेक सामाजिक कामंही केली.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 1, 2015 12:35 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close