S M L

'मेट्रो- 3'च्या विरोधात गिरगावकरांची मुख्यमंत्र्यांना 5 हजार पत्रं

Samruddha Bhambure | Updated On: Apr 3, 2015 03:19 PM IST

'मेट्रो- 3'च्या विरोधात गिरगावकरांची मुख्यमंत्र्यांना 5 हजार पत्रं

03 एप्रिल : राज्य शासनाच्या 'मेट्रो-3' प्रकल्पाला विरोध करत आज (शुक्रवारी) गिरगावकरांनी काळबादेवी पोस्ट ऑफिससमोर 'पोस्टकार्ड' आंदोलन केले. गिरगाव कृती समिती आणि शिवसेनेच्या नेतृत्त्वाखालील या आंदोलनात इथल्या रहिवाशांनी मेट्रो-3 प्रकल्पाला विरोध दर्शवत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तब्बल 5,000 लेखी पत्रं पाठवली. तसंच पोस्ट ऑफीसबाहेर जोरदार निदर्शने करत निषेध नोंदविला.

महत्त्वाचं म्हणजे सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेनेही गिरगावकरांच्या पुनर्वसनाच्या समस्यांकडे मुख्यमंत्र्यांचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. यापूर्वी शिवसेनेने इथे बंदची हाकही दिली होती. त्याला काँग्रेस आणि मनसेनेही पाठिंबा दिला होता. गिरगावातील प्रकल्पग्रस्तांचं पुनर्वसनाचा प्रश्न अजुनही सुटलेला नाही.

आश्वासनंदेऊनही मेट्रो-3 मधील प्रकल्पग्रस्तांना भेटण्यासाठी मुख्यमंत्र्यांना वेळ नाही म्हणून गिरगावकर आज रस्त्यांवर उतरले होते.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 3, 2015 03:08 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close