S M L

औरंगाबादमध्ये भीषण अपघातात एकाच कुटुंबातील 7 जण ठार

Samruddha Bhambure | Updated On: Apr 5, 2015 03:40 PM IST

औरंगाबादमध्ये भीषण अपघातात एकाच कुटुंबातील 7 जण ठार

05 एप्रिल : औरंगाबाद जिल्ह्यातील हतनूर गावाजवळ धुळे-सोलापूर महामार्गावर आज (रविवारी) सकाळी साडेसातच्या दरम्यान स्कॉर्पिओ आणि ट्रकची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील 7 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. तर, 3 जण गंभीर जखमी झाले. जखमींना जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हतनूरजवळ समोरून भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने मोटारीची समोरून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जबरदस्त होती की त्यात स्कॉर्पियोचा अक्षरश: चेंदामेंदा झाला. यामध्ये मोटरीतील 7 प्रवाशांचा मृत्यू झाला, मृतांमध्ये महिलेसह एका लाहन मुलीचा समावेश आहे. तसंच 3 जण गंभीर जखमी झाले. जखमींना जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

कन्नड तालुक्यातील अंधानेर गावातील शेख कुटुंबीय गोव्याला मुलीच्या उपचारासाठी गेले होते. उपचार करून हे सर्व गावी परतत असताना हा भीषण अपघात झाला. अपघातात त्या मुलीचाही मृत्यू झाला आहे.

दरम्यान, अपघातामुळे महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्याने वाहतूक दोन तास ठप्प होती. अपघातग्रस्त गाड्या हटविल्यानंतर वाहतूक हळूहळू पूर्ववत झाली.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 5, 2015 12:00 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close