S M L

साखर क्षेत्रातून पवार गटाचे पॅकअप

Samruddha Bhambure | Updated On: Apr 5, 2015 02:23 PM IST

साखर क्षेत्रातून पवार गटाचे पॅकअप

05 एप्रिल : माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत तब्बल 30 वर्षांनी सत्तापरिवर्तन झाले आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पॅनेलचा दणदणीत पराभव झाला आहे.

शनिवारी मतमोजणी सुरू झाल्यावर विजयाचे पारडे तावरे यांच्या सहकार पॅनेलकडे झुकत असल्याचे स्पष्ट झाले. माळेगाव कारखान्याच्या संचालकपदाच्या 21 जागा आहेत. रात्री उशिरा जाहीर झालेल्या निकालानुसार 21 जागांपैकी अजित पवार यांच्या निलकंठेश्वर पॅनेलला फक्त 6 जागावर विजय मिळला आहे. तर सहकार बचाव शेतकरी पॅनेलला 15 जागांवर विजय मिळाला आहे. त्यामुळे माळेगाव सहकारी साखर कारखान्याची सूत्र तावरेंच्या पॅनेलच्या हाती आली आहेत.

1997 साला पासून म्हणजेच तब्बल 30 वर्षांनंतर राष्ट्रवादीच्या पॅनेलला मोठा धक्का बसला आहे. चंद्राराव तावरे यांच्या सहकार बचाव आघाडीने अजित पवार यांच्या निलकंठेश्वर आघाडीला पिछाडीवर टाकले आहे. माळेगाव कारखान्याची निवडणूक अजित पवारांनी अतिशय प्रतिष्ठेची केली होती. पण तावरे आणि काकडे हे पवारांचे पारंपारिक स्थानिक विरोधी प्रथमच सहकार बचाव पॅनलच्या नेतृत्वाखाली एकत्रं आल्याने आणि सहकार कारखानदारीत अजित पवारांच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर खासगी साखर कारखाने काढल्याने तावरेंच्या गटाने या मुद्द्यावर अजित पवारांविरोधात रान पेटवले होते. याच मुद्द्यांवर अजित पवारांना हा पराभव पत्करावा लागला आहे.

पवारांच्या पराभवाच्या निमित्ताने IBN लोकमतचे काही महत्वाचे सवाल

  • सहकाराच्या राजकारणावरची पवारांची पकड ढिली होतेय का ?
  • सोमेश्वर, छत्रपती कारखान्याची निवडणूकही पवारांसाठी कस लावणारी ठरेल का?
  • माळेगाव कारखान्यातील पराभव ही अजितदादांसाठी धोक्याची घंटा आहे का ?
  • सहकारात पवारांनी खासगीकरण पुढे रेटल्यामुळेच हा पराभव झालाय का ?
  • टगेगिरीच्या राजकारणामुळेच अजितदादांचा पराभव झालाय का ?
  • माळेगावच्या पराभवातून अजित पवार काही धडा घेतील का ?

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 5, 2015 01:53 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close