S M L

दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना प्रीती झिंटाने दिला मदतीचा हात

Samruddha Bhambure | Updated On: Apr 5, 2015 07:02 PM IST

दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना प्रीती झिंटाने दिला मदतीचा हात

[wzslider autoplay="true"]

05 एप्रिल : आधी दुष्काळ आणि मग अवकाळी पाऊस, असा निर्सगाच्या दुहेरी कचाट्यात सापडलेल्या शेतक र्‍यांना अभिनेत्री प्रीती झिंटाने मदतीचा हात दिला आहे. प्रीतीने सिन्नरमधील निहाळे गावातील 20 शेतकर्‍यांना आर्थिक मदत दिली असून दुग्ध व्यवसायासाठी तिने 3 शेतकर्‍यांना गोदानही केले आहे.

राज्यातील शेतकरी नैसर्गिस संकटांनी हवालदील झाला असून सरकारने शेतकर्‍यांना मदत जाहीर करावी अशी मागणी केली जात आहे. शेतकर्‍यांच्या मदत मिळावी अशी मागणी करणारे अनेक असले तरी शेतकर्‍यांना स्वतःच्या खिशातून मदत करणारे त्या तुलनेत कमीच आढळतात. अभिनेत्री प्रीती झिंटा याला अपवाद ठरली आहे. प्रीतीने कोणताही गाजावाजा न करता सिन्नरमधील निहाळे गावातील दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना मदतीचा हात दिला.

प्रीती गावात आल्याचे प्रसारमाध्यमांना उशीराने कळले आणि मग हा सर्व प्रकार समोर झाला. निहाळे गावाला टँकरची गरज भासल्यास तुम्ही मला सांगा, मी स्वत: यासाठी आणखी मदत करेन असे आश्वासनही प्रीतीने शेतकर्‍यांना दिले. प्रीतीच्या या आदर्शवत कार्यातून अन्य कलाकारही बोध घेतील अशी आशा आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 5, 2015 05:12 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close