S M L

सानिया-मार्टिच्या जोडीने पटकावलं विजेतेपद

Samruddha Bhambure | Updated On: Apr 6, 2015 02:05 PM IST

सानिया-मार्टिच्या जोडीने पटकावलं विजेतेपद

06 एप्रिल : भारताची सानिया मिर्झा आणि स्वित्झर्लंडच्या मार्टिना हिंगीस यांनी मियामी ओपनच्या महिला दुहेरीचं विजेतेपद पटकावलं आहे.

अंतिम फेरीत अव्वल मानांकित असलेल्या सानिया-मार्टिनाने एकटेरिना आणि एलेना या रशियन जोडीचा 7-5, 6-1 असा धुव्वा उडवत विजेतेपदावर आपलं नाव कोरलं आहे. काल झालेल्या लढतीत सानिया आणि हिंगीसला पहिल्या सेटमध्ये झगडावे लागले. पण, दुसर्‍या सेटमध्ये त्यांनी प्रतिस्पर्ध्यांना संधी न देता 6-1 असा सेट जिंकून विजतेपद पटकावलं.

सानिया आणि मार्टिना यांचं हे सलग दुसरे विजेतेपद आहे. या दोघींनी दोनच आठवड्यापूर्वी माकारोवा आणि व्हेस्नीना या जोडीचाच पराभव करून इंडियन वेल्से टुर्नामेंटचं विजेतेपद मिळवलं होतं.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 6, 2015 02:05 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close