S M L

गुटखा खाण्याचे परिणाम मी भोगले आहेत - पवार

Samruddha Bhambure | Updated On: Apr 6, 2015 04:08 PM IST

गुटखा खाण्याचे परिणाम मी भोगले आहेत - पवार

06 एप्रिल : तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन आणि कॅन्सरचा संबंध नसल्याच्या वक्तव्याने वादग्रस्त ठरलेले भाजपा खासदार दिलीप गांधी यांचा काल (रविवारी) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी चांगलाच समाचार घेतला. मी गुटखा खात होतो, त्याचे परिणाम मी भोगले आहेत, अशी कबूली शरद पवारांनी दिली आहे. त्याचं बरोबर संसदेची केंद्रीय समिती आणि नगरच्या 'जाणकार' खासदारांच्या तंबाखुवरच्या मतांची आणि अहवालाची संसदेत चिरफाड करू, असं सांगत पवार यांनी तंबाखूविरोधात आक्रमक पवित्रा घेतला.

'तंबाखू सेवनाने कॅन्सर होतो हे अद्याप सिद्ध झालेले नाही, असा जावईशोध भाजपचे खासदार दिलीप गांधी यांनी लावला होता. त्यावर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना पवार भावुक झाले. तंबाखुबाबत मी काही वैद्यकीय जाणकार नाही. त्यामुळे याविषयी मी काय बोलणार. वैद्यकीय 'जाणकार'नगरमध्येच आहेत, असं सांगत पवारांनी, मी गुटखा खात होतो, त्याचे परिणाम मी भोगले आहेत. मला शस्त्रक्रिया करावी लागली, सगळे दात काढावे लागले. वेळीच हे उपचार केल्याने पुढचा धोका टळला.नगरचे लोकप्रतिनिधी तंबाखूचे समर्थन करीत असतील तर याबाबत आमचे ज्ञान अपुरे आहे. वैद्यकीय क्षेत्रातील त्यांना चांगली माहिती असावी, असा टोला दिलीप गांधींना लगावला. पण हा विषय जेव्हा संसदेत चर्चेला येईल, तेव्हा दोन्ही सभागृहांत या अहवालाची चिरफाड करू, असंही पवारांनी स्पष्ट केलं आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 6, 2015 04:08 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close