S M L

राज्यात कडक सुरक्षा व्यवस्था

12 ऑक्टोबर राज्यातल्या 1 लाख 62 हजार पोलिसांपैकी 80 टक्के पोलीस मतदानाच्या बंदोबस्तासाठी असणार आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर किमान एक पोलीस असेल. संवेदनशील, अतिसंवेदनशील मतदान केंद्रावर मोठा पोलीस बंदोबस्त असेल. तसेच नक्षलग्रस्त भागात नव्यानं सुरक्षेची आखणी करण्यात आली आहे. राज्यात एकूण 84 हजार मतदान केंद्र आहेत. राज्यभरात 58 हजार 474 व्यक्तींवर कारवाई करण्यात आली आहे. 27 हजार 413 परवान्याचे तर 400 विनापरवाना शस्त्रं जमा करण्यात आली आहेत. आचारसंहितेच्या काळात 468 दखलपात्र तर 19 अदखलपात्र गुन्ह्यांची नोंद करण्यात आली असल्याची माहिती कमिशनर अनामी रॉय यांनी पत्रकार परिषदेत दिली.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 12, 2009 11:49 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 12, 2009 11:49 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close