S M L

टोलमुक्तीच्या घोषणांमुळे हुरळून जाऊ नका - राज ठाकरे

Samruddha Bhambure | Updated On: Apr 10, 2015 09:16 PM IST

raj thakre

10  एप्रिल : सरकार फक्त टोलनाके बंद करण्याच्या घोषणा करते.पण, त्याबाबत कोणतीही स्पष्ट माहिती सरकारकडून दिली जात नाही, असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे. ही फक्त घोषणा आहे, हुरळून जाऊ नका असंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे. टोल आंदोलनांनंतर यापूर्वीच्या सरकारनेही अनेक टोलनाके बंद केले आहेत. मग, सरकारने आता बंदी घातलेल्या या टोलनाक्यांमध्ये पूर्वीच्या टोलनाक्यांचाही समावेश आहे किंवा नाही, अशी नेमकी माहिती लोकांना कळली पाहिजे. त्यासाठी सरकारच्या टोल धोरणात पारदर्शकता येण्याची गरज आहे, असं मत राज ठाकरे यांनी मांडलं आहे. ते शुक्रवारी मुंबईतील पत्रकार परिषदेत बोलत होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून महाराष्ट्रातील जनतेला खूप अपेक्षा असल्याचे त्यांनी म्हटलं. त्यासाठी लोकांसमोर सत्य परिस्थिती आणण्याची गरज राज यांनी व्यक्त केली. याशिवाय, आगामी काळात टोलनाक्यांवरील रोख पैसे घेण्याची पद्धत बंद करण्याच्या मागणीचा पुनरुच्चा त्यांनी केला.

टोलनाक्यांचा प्रश्न हा लोकांच्या जिव्हाळ्याचा विषय असूनही आपली न्यायालये मात्र, यासंदर्भातील निर्णय घेण्यात खूप वेळ लावतात, असे सांगत राज यांनी आपली नाराजी व्यक्त केली. टोलविषयी एखादा खटला दाखल केल्यास न्यायालय त्यासाठी तीन-तीन वर्षे तारीख देत नाही, याला काय म्हणायचे, असा सवालही त्यांनी केला. टोलचालक मनमानी पद्धतीने वागतात त्याविषयी न्यायालय काहीही बोलत नाही. मात्र, आम्ही टोलनाक्यांची तोडफोड केली तर आमच्यावर कारवाई करण्याचा दुजाभाव न्यायालयाकडून का करण्यात येतो, असा सवालही राज यांनी उपस्थित केला.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 10, 2015 09:16 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close