S M L

शिवसेना सत्तेचा दुरुपयोग करते - नारायण राणे

Samruddha Bhambure | Updated On: Apr 11, 2015 06:27 PM IST

शिवसेना सत्तेचा दुरुपयोग करते - नारायण राणे

06-Narayan-Rane

11  एप्रिल : अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या वांद्रे (पूर्व) विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी मतदान सुरू असून आचारसंहितेचे नियम मोडल्याने नारायण राणे यांचे दोन्ही मुलं निलेश आणि नितेश राणे यांची अटकेनंतर सुटका करण्यात आली आहे.

मुंबईतील वांद्रे (पूर्व) मतदारसंघात आज (शनिवार) पोटनिवडणुकीसाठी मतदान सुरू असताना आचारसंहितेच्या नियमांचं उल्लंघन केल्याने वाकोला पोलिसांनी आमदार नितेश राणे आणि खेरवाडी पोलिसांनी माजी खासदार निलेश राणे यांना ताब्यात घेतलं आहे. वांद्रे (पूर्व) मतदारसंघात नितेश राणे आपल्या सुरक्षारक्षकासह फिरत होते. तर निलेश राणे मतदान केंद्राजवळ कार्यकर्त्यांसह फिरत असताना पोलिसांनी ही कारवाई केली. आचारसंहितेच्या नियमांनुसार मतदान सुरू असताना अशा प्रकारे फिरता येणार नाही, असा युक्तिवाद पोलिसांनी करून नितेश आणि निलेश राणेंना ताब्यात घेतलं होते. त्यानंतर मुलांच्या सुटकेसाठी खुद्द नारायण राणे पोलिस ठाण्यात गेले होते. अखेर पोलिसांनी या दोघांची सुटका केली आहे.

यावेळी नारायण राणे यांनी शिवसेना सत्तेचा दुरुपयोग करत असल्याचा आरोप केला आहे. तसंच पाच वाजेपर्यंत शिवसेनेच्या कोणत्याही नेत्यांच्या गाड्या या परिसरात फिरू देणार नाही, असा इशाराच त्यांनी दिला आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 11, 2015 12:40 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close