S M L

अशोक चव्हाण यांची सुप्रिम कोर्टात धाव

Samruddha Bhambure | Updated On: Apr 13, 2015 01:59 PM IST

अशोक चव्हाण यांची सुप्रिम कोर्टात धाव

13  एप्रिल : आदर्श सोसायटी गैरव्यवहार प्रकरणातील आरोपी माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी मुंबई हायकोर्टाच्या निर्णयाविरोधात सुप्रिम कोर्टात धाव घेतली आहे.

आदर्श गैरव्यवहार प्रकरणात आरोपींच्या यादीतून आपलं नाव वगळण्यासाठी अशोक चव्हाण यांनी दाखल केलेली याचिका मुंबई हायकोर्टाने नुकतीच फेटाळली होती. आता या निर्णयाविरोधात चव्हाण यांनी सुप्रिम कोर्टात याचिका दाखल केली आहे. मुंबई हायकोर्टाच्या निर्णयामुळे आदर्श प्रकरणात चव्हाण आरोपींच्या यादीत आहेत. सुप्रिम कोर्टाने चव्हाण यांची याचिका दाखल करून घेत, त्यावर 24 एप्रिलला सुनावणी होणार असल्याचं म्हटलं आहे. तसंच महाराष्ट्र सरकारला या प्रकरणात आतापर्यंत झालेल्या सुनावणीचे तपशील देण्यास सांगितलं आहे.

मुंबईतील कुलाबा इथले कारगिल युद्धातील शहीदांच्या पत्नीसाठी आदर्श ही इमारत बांधण्यात आली होती. पण या इमारतीतील बहुसंख्य फ्लॅट हे अधिकारी आणि राजकीय नेत्यांनी लाटल्याचे उघड झालं होतं. अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना हा घोटाळा झाला आणि त्यामुळेच चव्हाण यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 13, 2015 01:59 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close