S M L

मुंबईला पुन्हा दहशतवादी हल्ल्याचा इशारा

Samruddha Bhambure | Updated On: Apr 14, 2015 08:34 PM IST

मुंबईला पुन्हा दहशतवादी हल्ल्याचा इशारा

mumbai-alert

13 एप्रिल : मुंबईतील हॉटेल आणि रेल्वे स्टेशन्सवर येत्या 2 ते 3 महिन्यात 26/11 प्रमाणे दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता गुप्तचर यंत्रणांकडून वर्तवण्यात आली आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुप्तचर यंत्रणांनी सर्वच राज्यांना अलर्ट करत पुढच्या काही महिन्यांत दहशतवादी हल्ल्याची शक्यता वर्तवली आहे. या महिन्याच्या सुरवातीला लष्कर ए तोयबा या दहशतवादी संघटनेचे पत्र गुप्तचर यंत्रणेच्या हाती लागले आहे. या पत्रात 8 ते 10 दहशतवादी समुद्र मार्गाने मुंबईत प्रवेश करून लोकल रेल्वे स्थानके आणि हॉटेल्समध्ये 26/11सारखा मोठा दहशतवादी हल्ला करण्याच्या तयारीत असल्याचं म्हटलं आहे. गुप्तचर विभागाने याबाबतचा अलर्ट महाराष्ट्र पोलिस, सीआयडी, स्थानिक रेल्वे पोलिस आणि शहर पोलिसांना दिला आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 14, 2015 01:47 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close