S M L

हेरगिरीची सर्व कागदपत्रे जाहीर करावीत - सूर्य बोस

Samruddha Bhambure | Updated On: Apr 14, 2015 02:53 PM IST

हेरगिरीची सर्व कागदपत्रे जाहीर करावीत - सूर्य बोस

14  एप्रिल : नेताजी सुभाष चंद्र बोस यांचे पणतू सूर्य बोस यांनी बर्लिनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी सूर्य बोस यांनी नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या मृत्यूसंदर्भातील फाईल्स सार्वजनिक करण्याची मागणी मोदींकडे केली. मोदी सरकार नेताजींच्या मृत्यूशी जोडलेलं सत्य समोर आणेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

जर्मनीच्या दौर्‍यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सूर्यकुमार बोस यांनी बर्लिनमध्ये भेट घेतली. या भेटीवेळी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यासंदर्भातील सर्व सरकारी कागदपत्रे जाहीर करावीत, अशी मागणी त्यांनी केली.

नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू झाला आहे, याबद्दल माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांना शेवटच्या क्षणापर्यंत विश्वास नव्हता. इतकंच नाही तर पंडीत नेहरू यांनी पन्नासच्या दशतकात नेताजींच्या आंदोलनावर गुप्तचर यंत्रणा रॉद्वारे पाळत ठेवली होती, असा आरोप बोस यांनी केला. हेरगिरीचे सत्य बाहेर आलंच पाहिजे, असं आपल्याला वाटतं आणि त्यामुळे या प्रकरणात आपण स्वता: लक्ष घालू, असं आश्वासन मोदी यांनी आपल्याला दिल्याचे सूर्यकुमार बोस यांनी सांगितलं आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 14, 2015 02:53 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close