S M L

महामानवाचं स्मारक आणि श्रेयाचं राजकारण

Samruddha Bhambure | Updated On: Apr 14, 2015 07:42 PM IST

महामानवाचं स्मारक आणि श्रेयाचं राजकारण

14  एप्रिल : भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 124 व्या जयंतीनिमित्त महामानवाला अभिवादन करण्यासाठी मुंबईतील चैत्यभूमी आणि नागपूरच्या दीक्षाभूमीवर भीमसागर उसळला होता. मुंबईतील चैत्यभूमीवर दुपारी हेलिकॉप्टरमधून बाबासाहेबांच्या स्मृतिस्थळावर पुष्पवृष्टीही करण्यात आली.

डॉ. आंबेडकरांच्या जयंतीदिनी त्यांच्या स्मारकाचं राजकारणही रंगलं. काँग्रेसनं या राजकारणात आघाडी घेतली. काँंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि मुंबई अध्यक्ष संजय निरूपम यांनी इंदू मिलमध्ये जाऊन प्रतिकात्मक भूमीपूजन केलं. पण हे भूमिपूजन म्हणजे नौटंकी आहे, अशी टीका आशिष शेलार यांनी केली. आम्हांला डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा विसर पडलेला नाही, इंदू मिल जमीन हस्तांतरण आम्हीच केलं आणि लंडनमधील डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचं घरही राज्य सरकारने विकत घेतलं, अशी आठवण त्यांनी यावेळी करून दिली. आरपीआय अध्यक्ष रामदास आठवले यांनीही काँग्रेसला लक्ष्य केलं. इंदू मिलमध्ये जे स्मारक होणार आहे, त्याचं श्रेय काँग्रेसनं लाटू नये, असं त्यांनी म्हटलं.

दरम्यान, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी सरकारकडून फक्त सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले आले होते, पण बाकी कोणताही बडा किंवा महत्त्वाचा नेता चैत्यभूमीवर गेला नाही. यावरुन काँग्रेसनंही युती सरकारला धारेवर धरलं. सरकारमधील मंत्र्यांनी चैत्यभूमीकडे पाठ फिरवली, बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी बडे मंत्री आले नाहीत अशी टीका काँग्रेसचे प्रदेक्षाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी शिवसेना, भाजपवर केली.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 14, 2015 07:42 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close