S M L

नारायण राणेंच्या घराबाहेर शिवसैनिकांचा जल्लोष

Samruddha Bhambure | Updated On: Apr 15, 2015 02:34 PM IST

नारायण राणेंच्या घराबाहेर शिवसैनिकांचा जल्लोष

15  एप्रिल : वांद्रे पूर्वमधील पोटनिवडणुकीत काँग्रेस उमेदवार नारायण राणे पिछाडीवर पडल्यावर शिवसैनिकांनी जुहूतील त्यांच्या घरासमोर फटाके फोडून जल्लोष केला. फटाक्यांच्या माळा लावून आणि शिवसेनेच्या विजयाच्या घोषणा देऊन शिवसैनिकांनी आपला आनंद साजरा केला. अनेक शिवसैनिक राणे यांच्या घरासमोर जमू लागल्यामुळे तिथली सुरक्षा पोलीसांनी वाढवली आहे. या ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी शिवसैनिकांना तेथून हटवण्याचा प्रयत्नही पोलीसांकडून करण्यात येत आहेत.

शिवसैनिकांनी राणे यांच्या घरासमोरील रस्त्यावर फटाक्यांच्या माळा लावला. त्याचबरोबर भगवा झेंडा फडकावून शिवसेनेच्या जयजयकाराच्या घोषणा देण्यात आल्या.

वांद्र्यातील मतमोजणी केंद्राबाहेरही शिवसैनिकांनी जल्लोष करायला सुरुवात केली. अनेक महिला याठिकाणी नारायण राणे यांच्याविरोधात घोषणा देत आहेत. 'एक लाडू, दोन लाडू... कोंबडी चोराला आम्हीच गाडू' अशा घोषणा शिवसैनिकांकडून देण्यात येत आहेत. नारायण राणे यांनी आता कोंबड्या विकण्याचा व्यवसाय करावा, अशीही कडवी टीका शिवसैनिकांनी केली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विजयाच्या घोषणाही यावेळी कार्यकर्त्यांकडून देण्यात आल्या.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 15, 2015 02:34 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close