S M L

माझ्या पराभवासाठी मीच जबाबदार - नारायण राणे

Samruddha Bhambure | Updated On: Apr 15, 2015 03:23 PM IST

माझ्या पराभवासाठी मीच जबाबदार - नारायण राणे

Naraynabfan

15  एप्रिल : माझ्या पराभवासाठी मीच जबाबदार आहे. त्याचा दोष काँग्रेसच्या इतर नेत्यांना देता येणार नाही, अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते नारायण राणे यांनी आज (बुधवारी) व्यक्त केली. वांद्रे पूर्व मतदारसंघात शिवसेनेच्या उमेदवार तृप्ती सावंत यांनी नारायण राणे यांचा 19 हजार मतांनी दारूण पराभव केला. या पराभवानंतर राणे यांनी पत्रकारांना प्रतिक्रिया देताना शिवसेनेवर टीका केली.

वांद्र्यामध्ये मतदारांनी विकासाला मते न देता भावनिक आधारावर मतं दिली आहेत. लोकांना विकास नको असंल, तर माझी काही तक्रार नाही. मला जनतेचा कौल मान्य आहे, असं राणे यांनी सांगितलं. काँग्रेसच्या सगळ्या नेत्यांनी माझ्यासाठी प्रचार केला. त्यामुळे इतर कोणाला मी दोष देणार नाही, असं ही ते म्हणाले.

शिवसेनेवर टीका करताना राणे म्हणाले, निष्ठा काय असते हे मला कोणी शिकवू नका. महापालिकेच्या पैशांवर जगतात ते निष्ठावान कसे, पदांसाठी पैसे घेतात ते निष्ठावान का, दोन टक्क्यांवर जगतात ते निष्ठावान का, असे प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केले. मला निवृत्तीचा सल्ला देणार्‍या गिरीश महाजन यांची स्वतःची लायकी काय, असाही टोला त्यांनी लगावला.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 15, 2015 03:23 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close