S M L

सायना नेहवाल पुन्हा 'नंबर वन'!

Samruddha Bhambure | Updated On: Apr 16, 2015 08:56 PM IST

Image img_183682_sayana_240x180.jpg

16  एप्रिल : 'भारताची 'फुल'राणी सायना नेहवालने पुन्हा एकदा बॅडमिंटनच्या जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान काबीज केलं आहे. विशेष म्हणजे, कोणताही सामना न खेळता सायना पुन्हा अव्वल स्थान प्राप्त केलं. चीनच्या ली शुरेईचे गुरूवारी जागतिक क्रमवारीतील स्थान घसरल्याने सायनाला पुन्हा पहिलं स्थान पटकावलं आहे. मलेशियन ओपन सुपर सीरिजच्या उपांत्य फेरीत सायना नेहवालला ली शूरेईकडून पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामुळे सायानाला आपलं अव्वल स्थान गमवावं लागले होते. मात्र शुरेईचे रँकिंग घसरल्यामुळे सायना पुन्हा एकदा 'नंबर वन' बॅडमिंटनपटू बनली आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 16, 2015 08:56 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close